उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची पोस्टरबाजी

0 1

मुंबई : शिवसेनेच्या अयोध्यामधील कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मनसेने जोरदार निशाना साधला आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अयोध्येला निघालो जोशात..राजीनामे मात्र अजूनही खिशात..अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरच लावली आहेत. शिवसेना-मनसेकडून अधूनमधून एकमेकांविरोधात राजकीय फटकेबाजी होत असते. अशा प्रकारे याअगोदरही मनसेने शिवसेनेवर टीकात्मक पोस्टरबाजी केली आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत शिवसेना सत्तेत असतानाही राम मंदिर उभारण्याच्या मागणीवरुन सरकारच्या विरोधातभूमिका घेतली आहे. भाजपाला इशारा देताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या,आपल्या आमदारांचे राजीनामे खिशात असल्याच्या विधानावरून मनसेने त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.