उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर: मोदींसह सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार !

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याती सत्तासंघर्षामुळे भाजप आणि शिव्सेनेंचे संबंध खूप ताणले गेले. अखेर युतीत फारकत होऊन महाविकास आघाडीचे सरकार बनले. २५ वर्षापासूनची युतीत झालेल्या तणावामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दरम्यान सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. दिल्ली दौऱ्यासाठी मुख्यमंत्री दुपारी दिल्लीला रवाना होणार आहे. भाजपाशी काडीमोड घेत मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा केवळ मोदी भेटीसाठीच चर्चेत नसून ते पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याआधी त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान औपचारिक भेटी झाल्या होत्या. मात्र, आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार बनल्याने ही भेट महत्वाची असणार आहे. भाजपाचे गेल्या 6 वर्षांपासून बाजुला केलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची ठाकरे भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अडवाणींच्या निवासस्थानी ते संध्याकाळी ७:३० वाजता जाणार आहेत.