सोमवारपासून दैनंदिन रुग्ण तपासणी टाळा

0

अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णालयात या; जळगाव आयएमएचे आवाहन

जळगाव – कोविड-१९(कोरोना)चा फैलाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशाने दि.२३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने तसेच महाराष्ट्रात १४४ कलम लावण्यात येत असल्याने, जळगाव जिह्यातील सर्व रुग्णालयातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहील, मात्र गरजेचे नसल्यास किंवा ठरलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलता येत असतील तर त्या या आकस्मिक काळात टाळाव्यात, असे आवाहन आयएमएचे सचिव डॉ धर्मेंद्र पाटील यांनी सर्व डॉक्टरांना आणि रुग्णांना केले आहे .

जिह्यात लॉक डाऊन असेपर्यंत सर्व डॉक्टरांनी आणि रुग्णांनी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करावे, रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने रुग्णासोबत केवळ एकाच नातेवाईकाने थांबावे, डॉक्टरांशी योग्य ती काळजी घेऊन, योग्य अंतर ठेवून संपर्क साधावा, रुग्णालयाच्या प्रतिक्षालयात गर्दी करू नये, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील योग्य ती खबरदारी घ्यावी. रुग्ण, रुग्णालयातील कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे आवाहन करण्यात येत आहे ,असे आयएमए चे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील ,अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी कळविले आहे.