उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !

1

जळगाव: जिल्ह्यामध्ये लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय जिल्हा उद्योग पुरस्कार २०१८ देऊन उद्योजक गिरीश खडके यांचा गौरव करण्यात आला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश खडके यांचा गौरव करण्यात आला. डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव ( लघु व मध्यम उद्योग ) तथा विकास आयुक्त ( उद्योग संचालनालय ) यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून गिरीश खडके उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.