उपक्रमशील शिक्षकाच्या विवाहात 12 व्यक्तींचा नेत्रदान संकल्प

0 1

वर्‍हाडींचे स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील पुस्तकाने स्वागत

भुसावळ- शहरातीलहिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. नं. मेहता हिंदी प्राथमिक विद्या मंदिरातील उपक्रमशील शिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव व नवरीसह 12 व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला तसेच विवाहाला उपस्थित सर्व वर्‍हाडी मंडळींना स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्व विकास या पुस्तकाची अनोखी भेट देण्यात आली. प्रसंगी अमित चौधरी, लीना पाटील, विजय चौधरी, वत्सला चौधरी, सुहास पाटील, संगीता पाटील, विद्या कोल्हे, हर्षल कोल्हे, हर्षा कोल्हे, विद्या कोल्हे, मुकेश कोल्हे, मीना कोल्हे आदी 12 जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. विवाहावेळी माजी खासदार उल्हास पाटील, डॉ. आर्विकर, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, प्रा.शैलेश राणे, डॉ.जगदीश पाटील, गणेश फेगडे, प्रसन्ना बोरोले, रवी पाटील यांच्या हस्ते नेत्रदान संकल्प प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे यांनी भेट दिली.