उपमहापौरांकडून दुसऱ्या दिवशीही सॅनिटायझर वाटप

0

जळगाव- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपमाहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे स्वखर्चातून सॅनिटायझर वाटप करीत आहेत. पहिल्या दिवशी एक हजार सॅनिटायझर वाटप केले .तसेच मंगळवारी मनपातील सर्व अघिकारी, कर्मचाऱ्यांना व जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सॅनिटायझर वाटप केले. यावेळी उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे, शैलेंद्र सोनवणे,मनिष भागवाणी,अनिल माळी, संदीप कोळी उपस्थित होते.