उपमहापौरांनी केले एक हजार सॅनिटायझर वाटप

0

जळगाव- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपमाहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांनी स्वखर्चातून एक हजार सॅनिटायझर वाटप केले. शहरातील बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस,ट्रान्सपोर्ट नगरातील ड्रायव्हर,जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी,भाजीपाला विक्रेते यांच्यासह मनपाचे आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्‍यांना सॅनिटायझर वाटप केले. यावेळी उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे, शैलेंद्र सोनवणे,मनिष भागवाणी उपस्थित होते.