उपायुक्त मुठे मास्तरांनी घेतली कर्मचार्‍यांची हजेरी !

0

लेटलतीफसह विनापरवानगी गैरहजर राहणार्‍या 75 कर्मचार्‍यांना नोटीस

जळगाव: महानगरपालिकेतील कर्मचारी उशीरा येणे,विनापरवानगी गैरहजर राहणे,सही करुन निघून जाणे ही बाब नित्याचीच झाली आहे.त्यामुळे मंगळवारी सकाळी उपायुक्त अजित मुठे आणि आस्थापना अधिक्षक सतीश शुक्ला यांनी प्रवेशद्वाराजवळ उभे राहून कर्मचार्‍यांची हजेरी घेतली.दरम्यान,उशीरा येणारे 40 कर्मचारी,ओळखपत्र नसलेले 22 तर अर्ज न करता रजेवर असलेले 13 अशा एकूण 75 कर्मचार्‍यांना नोटीस बजावली आहे. तसेच तीन दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मनपाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून उपायुक्त अजित मुठे यांनी तपासणी केली. मनपा कर्मचार्‍यांना ओळखपत्र देण्यात आले असून कार्यालयात येताना ओळकपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र 22 कर्मचार्‍यांकडे ओळकपत्र आढळून आले नाही.तसेच 40 कर्मचारी उशीरा आलेत तर 13 कर्मचारी विनापरवानगीने गैरहजर असल्याचे आढळून आले.त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा न दिल्यास किंवा खुलासा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे.

यापूर्वी लेटलतीफांना केले होते निलंबित
मनपात दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे प्रभारी आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार होता.त्यावेळी त्यांनी अचानक सकाळी प्रवेशद्वाराजवळ बसून हजेरी घेतली होती.त्यावेळी लेटलतीफ 100 कर्मचार्‍यांवर निलंनाची कारवाई केली होती.आता पून्हा उपायुक्त अजित मुठे यांनी हजेरी घेतल्यामुळे कर्मचार्‍यांध्ये एकच खळबळ उडाली आहे.