उमर खालिद ने परिस्थिती चे भान ठेवत येण्याचे नाकारले !

0

अमळनेर: येथील लोकशाही बचाव कृती समिती मार्फत आज आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. योगेंद्र यादव यांच्या सभेसाठी नाट्यगृहात सुरुवात होण्याआधी समता कला मंचच्या वतीने गाणे म्हणून सुरूवात करण्यात आली. उमर खालिद ने परिस्थिती चे भान ठेवत येण्याचे नाकारले, परंतु प्रतिभा शिंदेच्या मोबाईल वरून ऑडिओ पाठवून माईक वरून उपस्थितांना ऑडिओ ऐकविण्यात आला.

त्यानंतर विचारमंचावर योगेंद्र यादव यांचे आगमन होताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, मुस्लिम नेते करीम सालार, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, दलित नेते रामभाऊ संदाशीव, भारती गाला, ऍड शकील काझी आदी उपस्थित होते. योगेंद्र यादव यांनी मोदींवर निशाण साधत, प्रधानमंत्री यांना तिरंगा नाही दिसत त्यांना कपड्यांमध्ये फक्त टोपी दिसत असल्याचे सांगितले.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील शरसंधान साधतांना आदित्यनाथ आणि त्यांचे पूर्वज यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीही प्रयत्न केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर भगतसिंग यांचा दाखल देत भगतसिंग यांची शिक्षा वाचवण्यासाठी इंग्रजांना माफीनामा पाठवायचा नाही असे आपल्या कुटुंबियांना सांगितले. तर दुसरीकडे अंदमानात शिक्षा भोगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रत्यक्ष नाव न घेता वारंवार चार वेळा इंग्रज अधिकारी यांना माफीनामा लिहिला असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी भाषणात केला.