उमेदवारांना त्यांचा दैनंदिन खर्च ट्रु व्होटर अ‍ॅपवर देणे बंधनकारक

0 1

आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती
प्रशासनातर्फे प्रत्येक कुटुंबातील मतदान स्लिप देण्याचा प्रयत्न
धुळे । उमेदवारांना त्यांचा दैनंदिनखर्चाचा हिशोब ट्रु व्होटर अ‍ॅपवर सुध्दा ऑनलाईन देणे बंधनकारक असून आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची सर्व पक्ष व उमेदवारांनी दक्षता घ्यावी असे आवाहन राजकीय पक्ष, प्रतिनिधींच्या बैठकीत आज रोजी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली. धुळे मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना व पक्षांना निवडणुक प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नये व निवडणुक आयोगाच्या नियमांची व निर्देशांची माहिती व्हावी यासाठी आज आयुक्त दालनात राजकीय पक्ष व प्रतिनिधींची तिसरी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकी प्रसंगी आचारसंहितेचा दृष्टीने सर्व मुद्यांवर व उमेदवार व पक्षांना येणार्‍या अडचणींच्या मुद्यांबाबत सविस्तर चर्चा करुन उपस्थितांना समाधानकारक स्पष्टीकरण आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले.

शंकांचे केले निरासरण
या चर्चेंत संपर्क कार्यालयांची परवानगी, झेंडे, बॅनर याबाबत आयोगाचे निदे्रश उमेदवाराने पक्षाने देणगी, गिफ्ट, मदत हे सर्व निवडणूक खर्चाच्या हिशोबात घ्यावे. ट्रु व्होटर्स अ‍ॅपची कार्यपध्दती, पक्ष व उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता याबाबत मुद्देसुद चर्चा करण्यात आली. याबैठकीत महानगरपालिकेने धुळे वोटर्स सर्च अप वरुन मतदान जनजागृती विषयी व मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेने प्रथमच राबविलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन उपस्थितांनी केले.

मतदान यंत्राविषयी माहिती
प्रत्येक कुटुंबातील मतदार स्लिप देण्याचा प्रयत्न असुन यासाठी मनपा मार्फत 98 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. व्होटर्स स्लिपवर केंद्र अनुक्रमांक, बुथ नं. इ. सर्व माहिती देण्यात आलेली असुन उपस्थितांना मतदान स्लिपचा नमुना दाखविण्यात आला.तसेच मतदान यंत्राविषयी तसेच बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट विषयी व त्यामध्ये प्रभाग व उमेदवार निहाय करण्यात येणार्‍या फिडींग विषयी माहिती देण्यात आली. त्यासाठी वापरण्यात येणारे रंग, मतदानयंत्र नादुरुस्त झाल्यास त्यासाठी असणारी पर्यायी व्यवस्था इ. बाबत चर्चा करण्यात आली.

आचारसंहितेचे पालन करा
आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे व नियमांचे उल्लंघन करु नका व चुका होऊ देऊ नका अन्यथा त्याचे परिणाम होणार असून सर्वांनी काटेकोर दक्षता घ्यावी. तसेच जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले.