उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना पोलिओचे डोस

0

उरुळी कांचन :– येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ५ वर्षे खालील वयोगटातील मुला-मुलींना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. या केंद्रांमध्ये परिसरातील सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षे वयोगटातील मुलांना प्लस पोलिओ डोस दिला. डॉ. सुचिता कदम यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, सरपंच राजश्री वनारसे, डॉ. संदीप सोनवणे, आरोग्य सेवक बी.आर.जाधव आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे, डॉ. रवींद्र भोळे यांच्या दवाखान्यातही पल्स पोलिओचा उपक्रम पार पडला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, उपसरपंच सुनिल कांचन , डॉ. संदीप सोनवणे, पत्रकार अमोल भोसले, नंदकुमार मुरकुटे यांच्या हस्ते बालकांनी पोलिओचा डोस देण्यात आला.