एकावर खुनी हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

0

हिंजवडी ः येथील खासगी कंपन्यांमध्ये पाणी पुरवण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर तलवारीने वार करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथे घडली. गोरख राजाराम ओझरकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ राजाराम ओझरकर (वय 39, रा. माण ओझरकरवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल ओझरकर, राहुल ओझरकर, योगेश ओझरकर (सर्व रा. माण ओझरकरवाडी, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून हिंजवडी परिसरातील कंपनीत विकत पाणी पुरविण्याच्या कारणावरून फिर्यादी नवनात यांचे भाऊ गोरख यांच्यावर तलवारीने वार करून खुनी हल्ला केला. यामध्ये गोरख यांच्या डोक्यात, हातावर गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.