Friday , February 22 2019

‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम समाजाला दिशा देणारा

भुसावळ रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण मांडाळकर

भुसावळ- सण, उत्सवांत विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबवणार्‍या सेवाव्रतींना समाजाने खंबीर पाठबळ द्यावे, गरज ओळखून सेवाप्रकल्प निर्व्याज भावनेतून हाती घेणार्‍यांचे प्रमाण वाढायला हवे. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, असे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वयक अरुण मांडाळकर यांनी येथे नमूद केले. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी भुसावळ येथील स्वातंत्र्यसैनिक कृ. पा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ होते. अंतर्नादने गरज ओळखून जो उपक्रम राबवला आहे, तो पथदर्शी आहे, असे मांडाळकर यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश रायपुरे, नर्मदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, सचिव एस. डी. बर्‍हाटे, सदस्य यशवंत भंगाळे, प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे, सिद्धी विनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजू महाजन, मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रिना साळवी, शहराध्यक्ष विनोद पाठक, मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी यांची उपस्थिती होती. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.सुत्र संचालन ममता फालक यांनी तर आभार समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले.

125 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिक्षिका मीनाक्षी चौधरी, सुनीता बर्‍हाटे यांच्यासह ज्ञानेश्वर घुले, संजीव भटकर, प्रभाकर नेहेते, शैलेंद्र महाजन, महेश पाटील, सचिन पाटील, भूषण झोपे, संदीप सपकाळे, मंगेश भावे, नितीन देशमुख यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या 125 विद्यार्थ्यांना वह्या, पेपर लिहिण्याचे पॅड, वह्यांचे कव्हर, पेन, पेन्सील, खोडरबर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

लोकचळवळीचे स्वरुप यावे
अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी होऊन लोकचळवळीचे स्वरुप देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील, असे निलेश रायपूरे यांनी नमूद केले. प्रा.भाग्यश्री भंगाळे , परीक्षित बर्‍हाटे, रीना साळवी यांनीही विचार व्यक्त केले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!