एनआरसी विरोधात ठराव भोवले; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची भाजपातून हकालपट्टी

0

परभणी: केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए कायदा केल्यानंतर संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. दोन महिन्यापासून देशात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या संस्थेत एनआरसी रद्द करण्याबाबत ठराव करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या ताब्यात असलेल्या परभणी जिह्यातील सेलू येथील नगरपरिषदेत एनआरसी रद्द करण्याबाबत ठराव करण्यात आला होता. यावर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. नगराध्यक्ष, विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून भाजपातूनही त्यांची हकालपट्टी केली जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.