एमआयडीसीवर झोपडपट्टी धार्मिक स्थळ बचाव कृती समिती’चा धडक मोर्चा

0

नेरुळ । सध्या नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जमिनींवर उभारलेल्या सर्व धार्मिक स्थळांवर करावी करण्यात येत आहे. या विरोधात सोमवारी ख्वाजा मिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीवर मोर्चा काढण्यात आला. यात एमआयडीसीच्या उप अभियंत्यांना भेटून निवेदनाद्वारे आपल्या मागण्या सादर करण्यात आल्या. यात २००९ पूर्वीच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यात यावे. तसेच २००९ नंतर असलेल्या व कारवाई करून तोडलेल्या धार्मिक स्थळांचे पुनर्वसन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने १९९५ पूर्वीच्या झोपडपट्ट्या अधिकृत करून त्यांना फोटोपास देण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यानुसार २००० पूर्वीच्या झोपडपट्ट्यांचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी एमआयडीसी प्रशासनाने १५ दिवसांचा वेळ या आंदोलकांना दिला आहे. तसेच १५ दिवस कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

प्रशासन प्रत्येकवेळी झोपडपट्टी धारकांवर कारवाई करते. मात्र याच झोपडपट्टी मधील नागरिक मात्र या प्रशासनाला व राजकीय नेत्यांना मतदानाच्यावेळी अधिकृत वाटतात. या नागरिकांचे मतदान चालते. आज लोकसंख्या वाढत असताना जर प्रशासन स्वस्त दरात घरे देऊ शकत नसेल तर झोपडपट्ट्या निर्माण होणारच नाही.

झोपडपट्टांमध्ये प्रत्येक नागरिक आपल्या संस्कृती व धर्मानुसार धार्मिक स्थळे उभारणारच. त्यामुळे प्रशासनाने धार्मिक स्थळांवर करावाई करून भावना दुखवू नयेत. जेव्हा झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन होईल त्यावेळी धार्मिक स्थळांचे देखील पुनर्वसन करावे. तोपर्यंत करवाई करू नये. अशी मागणी ख्वाजा मिया पटेल यांनी केली आहे.