जळगावातील एमआयडीसीमध्ये दुचाकीसह तरुणाचा आढळला मृतदेह

0

अपघात नव्हे घातपाताचा कुटुंबियांचा आरोप : मित्रासोबत पार्टी करण्यासाठी पडला होता घराबाहेर

जळगाव– मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी दुचाकीवर घराबाहेर पडलेल्या शरद उर्फ भैय्या विठ्ठल कोळी (वय-31) रा. राममंदीर कोळीपेठ या तरुणाचा शुक्रवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील ई सेक्टरमध्ये एका कंपनीसमोर रस्त्यालगत मृतदेह आढळून आला. दुचाकी तसेच मोबाईलही आढळून आला असून हा अपघात नव्हे तर त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा आरोप शरदच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांनी हा अपघाताच असून घातपाताचा आरोप झाल्याने त्या अनुषंगाने प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयात गाठले होते, तसेच नातेवाईकांशी भेट घेतली होती.

मित्रानी दिला होता दुचाकीवरुन जाण्यास नकार

याबाबत माहिती अशी की, शरद उर्फ भैय्या विठ्ठल कोळी हा मोठा भाऊ मुकेश कोळी याच्यासोबत सावदा येथे मित्राच्या लग्नाला जावून येतो असे सांगून 27 रोजी सायंकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडला होता. तेथून तो घरी परतला. यानंतर मुंबईचे मित्र आले असल्याने त्याच्यासोबत पार्टीचे नियोजन ठरले होते. त्यासाठी शरद हा गुरूवारी सायंकाळी 6 वाजता जळगाव-भुसावळ रोडवरील हॉटेल गौरव येथे गेला. हॉटेलात रात्री उशीरापर्यंत मित्रासोबत शरदने जेवण तसेच मद्यप्राशन केले. यानंतर त्याने मित्राला वाल्मिकनगर येथे घरी सोडले व त्याची दुचाकी घेवून एमआयडीसीकडे निघाला. मद्यप्राशनामुळे सोबतच्या मित्रांनी मध्यरात्री शरदला दुचाकीवरुन जाण्यास नकारही दिला होता. मात्र त्यानेही काहीएक एैकले नाही, असेही मित्रांनी पोलिसांना सांगितले.

कंपनीच्या वॉचमनमुळे प्रकार झाला उघड

एमआयडीसी ई-23 सेक्टरमधील पॅराडाईज कंझुमार प्रॉडक्ट लिमीटेड कंपनीसमोरील बाजूस सकाळी 4 वाजता तरुण मयत स्थितीत तसेच त्याच्याजवळ मोबाईल तसेच दुचाकी आढळून आली. कंपनीचे वॉचमन याला पहाटे 4 वाजेच्या सुमारास प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वाठोरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले. व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील लायनन्समुळे तो शरद कोळी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली त्यांनीही जिल्हा रुग्णालय गाठले.

अपघात नव्हे माझ्या भावाचा खून झाला

शरद कोळीची मृत्यची बातमी नातेवाईक व मित्रांना मिळाल्यानंतर सर्वांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात गर्दी केली. याठिकाणी हा अपघात नसून शरदचा अज्ञात हल्लेखोरांनी खून केल्याचा संशय मयत शरदचा मोठा भाऊ मुकेश याने व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दुचाकी तसेच मोबाईल जप्त केली आहे. जिल्हा रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनीही नातेवाईकांकडून माहिती जाणून घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी तसेच परिस्थितीनुसार हा अपघात असून दुचाकीवरुन पडल्याने डोक्याला मार लागला व अतिरक्तश्रावाने शरदचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरदच्या मित्रांची होणार चौकशी

शरद कोळी हा खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई मंगलाबाई, भाऊ, पत्नी दिपाली, दीड वर्षाचा मुलगा जयदीप आणि चार वर्षाची मुलगी देवयानी असा परीवार आहे. शरदच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्याचे पितृछत्र हरपले आहे. शरदचे मुंंबईच्या मित्रासोबत मैत्री कशी, हॉटेलात पार्टी झाली त्यावेळी कोण कोण मित्र होते, जळगावातील तसेच मुंबईच्या सर्व मित्रांशी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी बोलतांना दिली.

कुटुंबियांचा अपघात नव्हे घातपाताचा आरोप ः मित्रासोबत पार्टी करण्यासाठी पडला होता घराबाहेर

जळगाव- मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी दुचाकीवर घराबाहेर पडलेल्या शरद उर्फ भैय्या विठ्ठल कोळी (वय-31) रा. राममंदीर कोळीपेठ या तरुणाचा शुक्रवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील ई सेक्टरमध्ये एका कंपनीसमोर रस्त्यालगत मृतदेह आढळून आला. दुचाकी तसेच मोबाईलही आढळून आला असून हा अपघात नव्हे तर त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा आरोप शरदच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांनी हा अपघाताच असून घातपाताचा आरोप झाल्याने त्या अनुषंगाने प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयात गाठले होते, तसेच नातेवाईकांशी भेट घेतली होती.