Tuesday , March 19 2019

एमआयमाईमरतर्फे केले महाआरोग्य शिबिराचे आयोजन

गुरूपौर्णिमेनिमित्त राबविला उपक्रम

तळेगाव दाभाडे : एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या कार्यास गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामुळे गरजुंवरील मानसिक आणि आर्थिक भार कमी होईल. एमआयमाईमर मेडिकल कॉलेजमुळे तळेगाव आणि परिसरातील चांगल्या वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक कार्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे तळेगावची नवी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडेचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी केले.

येथील विश्‍वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे व एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात हे शिबिर 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. शुक्रवारी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, नगरसेविका हेमलता खळदे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, नीता काळोखे, नगरसेवक संदीप शेळके, संदीप कारंडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता व प्राचार्या स्नेहल घोडे उपस्थित होते.

सुविधांची व्याप्ती वाढविली

डॉ. सुचित्रा म्हणाल्या की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी सुविधांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्याचा मोफत लाभ महाआरोग्य शिबिरात अधिकाधिक रुग्णांनी करून घ्यावा. हे शिबीर 3 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक शिबिरार्थींपर्यंत पोचण्यासाठी मदतीचे आश्‍वासन दिले. विरोधीपक्ष नेत्या हेमलता खळदे याचेही भाषण झाले. सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बेदरकार वाहने चालविणे पडणार महागात

वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार पुणे : नो एंट्रीमधून भरधाव वाहने चालविणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!