मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांपूर्वी युपीएससीने ऑक्टोबरमध्ये परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या स्थगित केलेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार एमपीएससीने वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा – १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर व अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – १ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.
ADVERTISEMENT
एमपीएससी स्टुडंट् राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून वेळापत्रक जाहीर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.