Saturday , April 21 2018

एम्सच्या 3 डॉक्टरांचा अपघाती मृत्यू

मृतांमध्ये अकोल्याच्या डॉक्टरचा समावेश

मथुरा : यमुना एक्स्प्रेस वे वर भरधाव कारने डम्परला धडक दिली. या अपघातात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिला डॉक्टरसह अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे रहिवासी असलेल्या डॉ. हर्षद वानखेडे यांचाही समावेश आहे. मथुरेतील सुरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले आणि…
टोयोटा इनोव्हा कार आग्राच्या दिशेने निघाली होती. सुरीर ठाण्याच्या हद्दीत कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डम्परला धडकली. त्यानंतर दुभाजकावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. मृत डॉक्टरांमध्ये डॉ. हर्षद वानखेडे (34), यशप्रीत काठपाल (25), डॉ. हेमबाला (24) यांचा समावेश आहे. मृतदेह सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. जखमींमध्ये डॉ. कॅथरीन हालम, महेश कुमार, जितेंद्र मौर्य, अभिनव सिंह यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हर्षद वानखेडे यांच्या वाढदिवसासाठी सात जणांचा हा ग्रुप आग्रा येथे चालला होता. हर्षद हे स्वत: गाडी चालवत होते. अपघात झाला तेव्हा सर्वजण निद्रावस्थेत होते, असे एका जखमी डॉक्टरने सांगितले. हर्षद यांना झोप न आवरल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हे देखील वाचा

माजी मुख्य न्यायाधीश सच्चर कालवश

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचे शुक्रवारी निधन झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!