एरंडोलमध्ये झाला ‘इतका’ गुटखा जप्त

एरंडोल – अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या पथकाने मंगळवारी गुटखा जप्त करण्याची कारवाई केली. दुपारी १.४०वाजेच्या सुमारास आनंद नगर येथे एकस गोदाम वर धाड टाकून अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या पथकाने ४४ हजार १६० रुपयांचा गुटखा जप्त कारवाई केली. झालेल्या या कार्यवाहीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आरोपी विजय भिका चौधरी याने सरकारी आदेशाचे उल्लंघन करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला गुटखा स्वतःच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भाग ५ गुना रजिस्ट्रेशन नंबर ३३/२१ भादवि कलम ३२८,१८८,२७२,२७३, सह कलम अन्नसुरक्षा मानके कायदा २०६ मधील कलम सहवाचा कलम ३० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे पुढील तपास करीत आहेत