एरंडोलला भीषण अपघात; सहा जण ठार !

0

एरंडोल: एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रक आणि कालीपिली दरम्यान भीषण अपघात झाला. यात सहा जण ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की पाच जण जागीच ठार झाले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुळ्याहून जळगावकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १५ जी.८४७४ याचा स्टेरिंगचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक समोरून येणाऱ्या कालीपिली क्रमांक एमएच १९ वाय.५२०७ वर आदळला. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कालीपिलीमधील चालक व इतर चार प्रवाशी हे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एरंडोल रुग्णालयात जखमीचा मृत्यू झाला.