एरंडोल तालुक्यात मार्चअखेर कोरोनाचा एकही रुग्ण नाही- डॉ. फिरोज शेख

0

एरंडोल मार्च अखेर एरंडोल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. ४ रुग्णांना जळगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असता, तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसून आली नाही. म्हणून त्यांना घरी पाठवण्यात आले‌ अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी दिली.

एरंडोल तालुक्यात मुंबई, पुणे ,सुरत यासारख्या अनेक बाहेरगावाहून एकूण ३,४४१ व्यक्ती परत आल्या, त्यात शहरी भागातील ३६४ व्यक्ती आहेत व ग्रामीण भागातील व्यक्ती ३ हजार ७७ आहेत. एरंडोल तालुक्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची संख्या २० असुन पैकी १९ शहरातील व १ ग्रामीण भागातील आहे. असे डॉ. फिरोज शेख यांनी स्पष्ट केले.