एरंडोल तालुक्यात विदेशातून आलेल्या १५ व्यक्तींना विलगीकरणाचा सल्ला

0

एरंडोल: विदेशातून आलेल्या तालुक्यातील एकूण १५ व्यक्तींना स्वतःच्याच घरी एका खोलीत राहण्याचा (विलगीकरणचा) सल्ला देण्यात आलेला आहे. त्यात एरंडोल येथील १४ व्यक्ती व ग्रामीण भागातील १ व्यक्तीचा समावेश आहे.

मुंबई ,पुणे व इतर शहरातून एकूण २३७० व्यक्ती तालुक्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हा आकडा ग्रामीण भागातील आहे. एरंडोल या शहरी भागात पुण्या-मुंबईसारख्या शहरातून किती व्यक्ती एरंडोल येथे परतल्या याबाबत एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील. यांनी माहिती देण्याबाबत असमर्थता दर्शवली, या आधी सुद्धा त्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष व टाळाटाळ केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध शहरातून आलेले २३७० व्यक्तींना विलगीकरणच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.