एरंडोल पालिकेचा लाचखोर कार्यालय अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

दिड लाखांची लाच भोवली

एरंडोल : सील केलेले गाळे ताब्यात देवून त्याचे नूतनीकरण करण्याच्या मोबदल्यात दिड लाखांची लाच मागणाऱ्या एरंडोल पालिकेतील लाचखोर कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ ( 51 , रा . 24 , म्हाडा कॉलनी , अमळनेर , जि.जळगाव ) यास शुक्रवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच एरंडोल पालिकेच्या वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे . दरम्यान , संशयीताने एव्हढ्या मोठ्या प्रमाणावरील लाच कुणाच्या सांगितल्यावरून मागितली याचा उलगडा एसीबीच्या खोलवर चौकशीत होणार आहे . या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला .दिड लाखांची लाच भोवली एरंडोल शहरातील 51 वर्षीय तक्रारदाराने धुळे एसीबीकडे या संदर्भात 12 रोजी तक्रार नोंदवली होती . आरोपी पालिका कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्याना नोटीस न देण्यासाठी 12 मार्च रोजी दोन लाखांची लाच मागितली मात्र दिड लाखात तडजोड झाली . एसीबीने सापळा रचल्यानंतर आरोपीने शुक्रवारी दुपारी दिड लाखांची लाच पालिकेत स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर पालिकेत यानंतर मोठी खळबळ उडाली . यांनी केला सापळा यशस्वी हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे , सुधीर सोनवणे , संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी , राजन कदम , सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला .