एसबीआयच्या ग्राहकांना मोठा दिलासा; ‘मिनिमम बॅलन्स’ची अट रद्द

0

नवी दिल्लीः स्टेट बँकेने ‘मिनिमम बॅलन्स’बाबत मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयने बचत खात्यांसाठी’मिनिमम बॅलन्स’ची अट काढून टाकली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेने याबाबत आदेश जाहीर केले आहे. आता बचत खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ रक्कम ठेवण्याचे कोणतेही बंधन ग्राहकांवर नसेल.

बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक रक्कम नसल्यावरही बँक कोणताही दंड वसूल करणार नसून याचा 44 कोटी 51 लाख बचत खातेदारांना फायदा पोहोचणार आहे. सध्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांना ठरावीक नेमून दिलेली रक्कम बचत खात्यात ठेवावी लागते. खात्यात किमान शिल्लकीच्या कमी रक्कम झाल्यास त्यावर बँक 5 ते 15 रुपये दंड कराच्या स्वरूपात वसूल केले जातात. या निर्णयापूर्वी शहरांसाठी 3000 रुपये, निमशहरी भागातील खातेदारांसाठी 2000 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा सरासरी 1000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट होती. मात्र आता ती अट आता शिथिल करण्यात आली आहे.