एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या वतीने भुसावळ विभागाला 31 व्हीलचेअर

0 1

भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकासह विभागातील दहा स्थानकांवरील दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल 31 व्हीलचेअर रेल्वे, रोटरी व एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या सहकार्याने बुधवारी डोनेट करण्यात आल्या. भुसावळ रेल्वे स्थानकावर डीआरएम आर.के.यादव यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्यासह रोटरी डिस्ट्री.गर्व्ह.राजीव शर्मा, एसबीआय लाईफचे डिस्ट्रीक्ट मॅनेजर सुमित पाटील, एसबीआयचे सिनी.टेरीटरी मॅनेजर अनंत भोळे, रोटरी पास्ट प्रेसि.धर्मेंद्र मेंडकी, प्रगत शेतकरी भास्कर पाटील (निंभोरा), पांडुरंग एस.जाधव, रोटरॅक्ट अध्यक्ष वेदश्री फालक, अपुर्वा फेगडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सीए मुकेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.