आता ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेता अभिषेख बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सुरुवातीला अमिताब बच्चन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर अभिषेक बच्चन आणि आता ऐश्वर्या राय बच्चन, मुलगी आराध्या पॉझिटिव्ह आली आहे. बिग बी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. सर्वत्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना होत आहे.