ऑडिओ क्लिपमुळे राजस्थान सरकार पुन्हा संकटात; कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर कारवाई

0

जयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. अशोक गेहलोत यांना सरकार टिकेल असा आत्मविश्वास असल्याने कॉंग्रेसने सचिन पायलट आणि त्यांच्या सहकारी आमदारांवर कारवाई केली आहे. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले आहे. मात्र अजूनही राजस्थान सरकारवरील संकट कायम आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. त्यामुळे राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जयपूरमधील संजय जैन यांच्या मार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात असल्याचा दावा आहे. काँग्रेसने या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सूरजेवाला यांनी ही माहिती दिली.

काल गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. यावरूनच आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचे प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाकडून रद्द करण्यात आले आहे. पक्षाने त्यांना काऱणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

राजस्थानमधील सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपकडून (SOG) एफआयर दाखल केला पाहिजे. त्यांना अटकही करावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.