ऑल इंडीया आरपीएफ क्रॉस कंट्री चॅम्पियनशीपमध्ये भुसावळ पथकाने पटकावले विजेतेपद

0 2

भुसावळ- पश्चिम रेल्वेद्वारे गुजराथमधील बलसाड येथे आयोजीत केलेल्या ऑल इंडीया आरपीएफ क्रॉसकंट्री चॅम्पियनशीप 2018 मध्ये भुसावळ येथील टिमने सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने ऑल इंडीया विजेतेपद पटकाविले. संघाचे भुसावळ येथे आगमन आल्यावर डीआरएम आर.के. यादव व रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त अजय दुबे यांनी स्वागत व कौतुक केले.

भुसावळलच्या संघाला ऑल इंडीया विजेते पद
गुजराथमधील बलसाड येथे 27 व 28 जुलै रोजी झालेल्या ऑल इंडीया आरपीएफ क्रॉस कंट्री चॅम्पियनशीप 2018 चे आयोजन करण्यात आले होते. वरीष्ठ आयुक्त दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम मॅनेजर रोशन जमीर हे संघाला बलसाड येथे घेऊन गेले होते. बलसाड येथे दोन दिवसीय झालेल्या क्रॉस कंट्री चॅम्पियनशीप स्पर्धेत भुसावळ येथील पथकाने नेत्रदीपक खेळ केला. यात आरक्षक मालिका अर्जून पराडे यांनी गोल्ड मेडल मिळविले तर आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, सुरेश यादव, गोविंद मीना, महिला आरक्षक महजबी खातून व शिल्पा उकाडे यांनी चांगला खेळ खेळला. यामुळे ऑल इंडीया आरपीएफ क्रॉस कंट्री मध्ये ऑल इंडीया विजेते पद पटकावले.

डीआरएम यादव यांनी केला खेळाडूंचा गौरव
गतवर्षी सुध्दा 2017 मध्ये मध्य रेल्वेच्या टीमने ऑल इंडीया आरपीएफ अ‍ॅथलेटिक स्पर्धेत दानापूर येथे सहभाग नोंदवला होता. तेथे ही भुसावळ टिमने अन्य संघांना धूळ चारत अ‍ॅथेलेटिक स्पर्धा 2017 चे विजेतेपद पटकावले होते. सलग दोन वर्ष ऑल इंडीया स्तरावर विजय हा मध्य रेल्वेसाठी ऐतिहासीक ठरल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. बुधवारी विजेत्या खेळाडूंनी व रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त अजय दुबे यांनी डीआरएम यादव यांची भेट घेऊन विजयाची माहिती दिली. यावेळी उपस्थित खेळाडूंचे कौतुक करून भविष्यात अजून चांगल्या खेळाची अपेक्षा व्यक्त केली.

सलग दुसर्‍यावर्षी विजेते
भुसावळ मंडळाचा संघ सलग दुसर्‍या वर्षीही विजेता ठरला आहे. गेल्या वर्षी दानापूर येथे झालेल्या अ‍ॅथेलेटीक स्पर्धेत यश मिळविल्यावर तेथे मिळालेले विजेते पद आणि गुजराथमधील बलसाड येथे झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत मिळालेले ऑल इंडीया विजेते पद हे टिम मधील सदस्यांच्या मेहनतीचे फळ आहे, अशी भावना टिम मॅनेजर रोशन जमीर यांनी व्यक्त केली.