भुसावळ : रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून प्रवाश्यांसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवासाच्या सुरूवातीला आणि स्टेशनवर कोविड 19 चे दुष्पपरीणाम लक्षात घेता विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असल्यानंतर स्टेशनवर प्रवेशास परवानगी असेल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
या नियमांचे करावे लागेल पालन
आरोग्य सेतु अॅप प्रत्येक प्रवाशांच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक असणार आहे शिवाय कोविड 19 चा प्रभाव लक्षात सुरक्षेचा विचार करून रेल्वे प्रवाश्यांनी प्रवासाच्या सुटण्याच्या वेळेच्या किमान 90 मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक आहे. जेणेकरून थर्मल स्क्रीनिंग करता येणार आहे. प्रवाश्याला कोविड 19 सारखी तीव्र तापाची लक्षणे आढळल्यास त्याला प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही तसेच असे प्रवासी तिकीट परीक्षकाकडून विना-प्रवास प्रमाणपत्र घेऊन तिकिटांची संपूर्ण रक्कम घेऊ शकतात. रेल्वे प्रवाशांना स्थानक आणि गाड्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करावा लागणार आहे तसेच वातानुकूलित कोचमध्ये पडदे बसवले जाणार नाहीत आणि प्रवासादरम्यान बेडरोलही दिले जाणार नाहीत, प्रवाशांना त्यांचा बेडरोल सोबत घ्यावा लागेल. प्रवाशांनी जास्तीत जास्त अन्न आणि पाणी आपल्याबरोबर सोबत घ्यावे, तथापी आयआरसीटीसी द्वारे पँट्री कार गाड्यांमध्ये पैसे देऊन भोजन आणि पॅकेज पिण्याचे पाणी पुरवेल आणि स्टेशनवर खाद्य स्टॉल्स खुले असतील. स्टॉलवर सामान घेताना सामाजिक अंतरांची काळजी घ्यावी लागणार आहे तसेच स्टेशनवर प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार नाहीत, स्पेशल ट्रेनच्या परताव्याचे नियम तसेच राहतील. जे पूर्वी प्रमाणे होते व प्रवासादरम्यान कमीत कमी सामान घेऊन प्रवास करावा तसेच या संदर्भात प्रस्थान स्टेशन व गंतव्य स्टेशनवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन प्रवाशांना करावे लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.