कन्हाळेत एकाची गळफास घेवून आत्महत्या

0 1

भुसावळ- तालुक्यातील कन्हाळे बु.॥ येथे बाळा अमृत सपकाळे (48, कन्हाळे बु.॥) या इसमाने घरी कुणी नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी सव्वा वाजता ही घटना उघडकीस आली. मयताने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सुधीर तुळशिराम जोहरे (कन्हाळे बु.॥) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.