कन्हाळे येथे 60 हजाराची हातभट्टीची दारू नष्ट

0

भुसावळ- तालुक्यातील शिवपूर कन्हाळे येथे नाल्याकाठी पिरू गंगा गवळी (62)हा गावठी हातभट्टीची दारू तयार करताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसांनी कारवाई करीत 60 हजारांची हातभट्टीची दारू नष्ट केली. पोलिसांनी घटनास्थळावरून गूळ, नवसागर, महू मिश्रीत कच्चे रसायनाचे भरलेल्या 12 ड्रममधील दोन हजार 400 लिटर गरम रसायन आणि तयार 80 लिटर दारू असे एकूण 59 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गजानन करेवाड, विठ्ठल फूसे, रीयाज शेख, काझी, उमेश बारी, शिवाजी खंडारे, काळे आदींच्या पथकाने केली.