कमळाचे भवितव्य वाघाच्या हातात; संजय राऊतांनी व्यंगचित्रातून भाजपला डिवचले !

0

मुंबई: काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.आता निकालानंतर सत्ता कोण स्थापन करणार आणि कोण मुख्यमंत्री होणार? याचीच चर्चा सुरु आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत असले तरी शिवसेना+राष्ट्रवादी+कॉंग्रेस+इतर मिळून सत्ता स्थापनेचा देखील एक पर्याय खुला आहे. अर्थात राजकीय परिस्थिती पाहता ते शक्य नाही. परंतु सध्या सत्तेचे सूत्र सेनेच्या हातात आहे. यातूनच सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. याच परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट केले आहे, यात वाघाच्या गळ्यात घड्याळ असून हातात कमळाचे फुल आहे. गळ्यात घड्याळ घालून वाघ कमळाच्या फुलाचा सुगंध घेत असल्याचे यातून दिसते. शेवटी संजय राऊत यांनी ‘बुरा ना मानो दिवाली है !’ असेही म्हटले आहे.