कमांडो-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन जवान शहीद; एका नक्षलवाद्याचा खात्मा !

0

इरापल्ली: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इरापल्ली येथे आज सकाळी कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एका नक्षलवाद्याचा ठार करण्यात यश आले असले तरी दोन जवान शहीद झाले. चार कमांडो जखमी झाले आहे. चकमकीच्या ठिकाणावरून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत. आज सकाळी कोब्रा बटालियनचे कमांडो शोधीमोहीम राबवत असताना, त्यांच्यावर इरापल्ली गावाजवळ नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.