कर्करोग मुक्ती जनजागृतीसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयाची प्रभातफेरी

0

रावेर- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कर्करोग (कॅन्सर) आजाराचे निर्मूलन व्हावे यासाठी संपूर्ण राज्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने रावेर ग्रामीण रुग्णालयाकडून जनजागृती प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली.

शहरात प्रभातफेरीने वेधले लक्ष
रावेर ग्रामीण रुग्णालयात सरदार जी.जी.हायस्कूल व कमलाबाई गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. कर्करोग जागृती करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. प्रभातफेरीत माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, वन परीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, श्रीराम फाऊंडेशनचे सचिव दीपक नगरे, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी केले. मुख कर्करोगा विषयी डॉ.प्रियांका कडू यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन मुख्य अधिपरिचारिका कल्पना नगरे यांनी तर आभार रवी नागरे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
औषध निर्माण अधिकारी प्रशांत जंगले, मुख्याध्यापक शिरीष वाणी, पर्यवेक्षक ई.जे.महाजन, टी.बी.महाजन, रमण तायडे, अधिपरीचारिका विमल धनगर, मोहिनी सोनवणे, कोमल जाधव, सुवर्णा गाढे, अनु चावरे, अर्चना पाटील, पूनम चौधरी, नीलिमा लढे, मंगला वळवी, आरोग्य सेवक कुशल पाटील, गणेश महाजन, आसीफ तडवी, गोविंद पवार, के.डी झोपे, सी.एच.कोल्हे, पी.के.महाजन, सुनील कोळी, रफिक तडवी, एच.एस.पाटील, गणेश कुंभार यांच्यासह आरोग्य कर्मचारी शिक्षक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.