कर्जोदजवळ टाटा मॅजिकची दुचाकीला धडक : दोघे गंभीर

0

रावेर- भरधाव टाटा मॅजिक वाहनाने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कर्जोद गावाजवळ घडली. टाटा मॅजिक चालकास रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीतील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्यास त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले.

टाटा मॅजिक चालक ताब्यात
कर्जोद गावाजवळ दुचाकी (क्रमांक एम.एच.19-8928) वरून ईश्वर भगवान सावळे व गोकुळ गोपाळ धनगर (35, रा.अहिरवाडी) हे जात असताना भरधाव वेातील टाटा मॅजिक (एम.पी.-0173) ने धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर ईश्वर सावळे यांची प्रकृती अधिकृत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. गोकुळ धनगर याला यांच्यावर रावेरमधील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. रावेर पोलिस ठाण्यात टाटा मॅजिक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून विजय वाघ असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तपास निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.