कर्जोदनजीक आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0

रावेर : तालुक्यातील कर्जोदनजीक अज्ञात आयशर गाडीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. लोणी (मध्यप्रदेश) येथील रहिवासी अर्जुन सुभाष पारसे (29) हे खाजगी कामानिमित्त रावेर येथे आल्यानंतर परतीच्या प्रवासात ते रावेरकडून बर्‍हाणपूरकडे दुचाकीने जात असताना समोरून येणार्‍या आयशरने जोरदार धडक दिल्याने अर्जुन पारसे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आयशर चालक पसार झाला. जखमी अर्जुन पारसे यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.