Wednesday , December 19 2018
Breaking News

कर्णधाराचा फॉर्म भारत संघासाठी चिंतेचे कारण

कोलंबो । निडहास ट्रॉफी टी 20 तिरंगी मालिकेतील बुधवारी होणार्‍या सामन्यात भारताचा सामना बांगलादेशशी होईल. हा सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. भारतीय संघाने तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. या सामन्याचा विचार केला तर बांगलादेशाच्या तुलनेत भारतीय संघ प्रबळ मानला जात आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून मिळालेल्या पराभवामुळे बुधवारी होणार्‍या सामन्यात भारतीय संघ कुठलाही नवीन प्रयोग करणार नाही, अशी आशा आहे. श्रीलंकेवर 215 धावांनी मिळवलेल्या विजयामुळे बांगलादेशाचे हौसले बुलंद झाले आहेत. त्यामुळे भारतावर विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. हा सामना भारताने गमावल्यास संघाच्या अंतिम फेरीत खेळण्याच्या आशा कायम राहतील, पण हे सारे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे. मागील दोन सामन्यातील विजयानंतर भारताचा रनरेट 0.21 अधिक असा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयोग करण्यात आला. पण आता चाहत्यांची अपेक्षा गृहीत धरून संघात फारसे बदल करता येणार नाहीत. त्यामुळे आतापर्यंत दौर्‍यात एकही सामना न खेळलेल्या दीपक हुड्डा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल सारख्या खेळाडूंना बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे.

कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. सुरेश रैनासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. संघासाठी चांगली सुरुवात केल्यावर त्याला मोठी खेळी करावी लागणार आहे. दिनेश कार्तिकने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत 39 धावा केल्या आहेत. त्यामुळे रुषभ पंतला अंतिम 11 जणांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. या सामन्यात बांगलादेशाच्या फलंदाजांना रोखण्याची मोठी जबाबदारी भारतीय गोलंदाजावर असणार आहे. मागील सामन्यात भारताने बांगलादेशला 139 धावांवरच रोखले होते. पण दुसर्‍याच सामन्यात तमीम इक्बाल, लिंटन दास आणि मुशफिकर रहिमने श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगलीच धुलाई केली होती. या सामन्यात बांगलादेशाच्या फलंदाजांनी 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत धमाकेदार विजय मिळवला होता. गोलंदाजीत आयपीलमध्ये सर्वाधिक किंमत मिळालेला जयदेव उनाडकट तिन्ही सामन्यांमध्ये महागडा गोलंदाज ठरला. मुंबईकर शार्दूल ठाकूरने दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. त्याशिवाय फिरकी गोलंदाज सुंदर वॉशिंग्टनही संघासाठी उपयोगी ठरला आहे.

उभय संघ : भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रुषभ पंत.

बांगलादेश : मोहमुद्दालाह (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्य सरकार, इमरुल कायेस, मुशफिकर रहिम, शब्बीर रहमान, मुस्तफिजुर रहमान, रुबैल हुसैन, तस्कीन अहमद, अबू हैदर, अबू जायेद, अरिफुल हक, नजमुल इस्लाम, नूरल हसन, मेहदी हसन, लिंटन दास.

About admin

हे देखील वाचा

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा चिवट खेळी सुरु

पर्थः ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आजपासून दुसरी कसोटी पर्थच्या मैदानावर खेळली जात आहे. या मालिकेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!