कृउबा सभापती नीळकंठ भारंबे ः रावेर शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण
रावेर- सृष्टी वाचविण्यासाठी आताच्या काळात वृक्ष लागवड गरजेची असून त्यातून नैसर्गिक घटक त्यातून तयार होवून पाऊस, पशू, पक्षी आणि आपल्याला सुध्दा जगायला मदत होते. वृक्षांचे अस्तित्व संपल्यास सर्वत्र हाहाःकार माजेल त्याकरीता प्रत्येकाने आपली जवाबदारी समजून जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करावेत, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी यांनी येथे केले.
यांची होती उपस्थिती
कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे परीसराच्या आवारात सोमवारी वृक्ष लागवड करण्यात आली. बाजार समिती सुमारे 400 विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक डी.सी.पाटील, बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे तसेच यार्ड वरील व्यापारी कन्हैया शेठ, अनिलशेठ अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन व सर्व कर्मचारी यांच्या हस्ते रावेर मुख्य मार्केट यार्डवर वृक्षारोपण करण्यात आले.
निरोगी आयुष्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे -डॉ.एस.आर.पाटील
रावेर- आपले आयुष्य आपण आपल्या कुटुंबाच्या उज्वलतेसाठी खर्च करत असतो परंतु आजच्या काळात पर्यावरणाचा र्हास मोठ्या प्रमाणात झालेला असून आपल्या भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी वृक्ष संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे परखड मनोगत ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डॉ.एस.आर. पाटील यांनी रावेर येथे ‘एकच लक्ष 13 कोटी वृक्ष’ या मोहिमेत सहभागी होत आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यक्त केले. रावेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दारा मोहम्मद होते.
यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विजय ढगे, वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, रमेश महाजन, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सी.एच.पाटील, नगरसेवक सुरज चौधरी, सुधीर पाटील, शे.सादिक शे.नबी, शारदा चौधरी, अग्रवाल, रमजान तडवी, काशिनाथ रायमळे, विनायक महाजन, सुधाकर चौधरी, माउली फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, गणेश अजनाडकर, आर.के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथम दयाराम मानकरे यांनी प्रास्ताविक तर आभार वन परीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी मानले.