कलारंग संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘एक तोचि नाना‘ कार्यक्रम

0

सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत

पिंपरी ः कलारंग सांस्कृतिक कला संस्था, पिंपरी-चिंचवड च्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. 22 जानेवारी 2020 रोजी एक तोचि नाना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने नाटय अभिनेते व नाम फांऊडेशनद्वारे सामाजिक क्षत्रात कार्यरत असणारे नाना पाटेकर यांचा सांस्कृतिक व सामाजिक प्रवास उलगडणारी प्रकट मुलाखत होणार आहे. ही मुलाखत प्रसिध्द मुलाखतकार व संवादक समीरन वाळवेकर घेणार आहेत, अशी माहिती कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी रविवारी (दि.19) पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी कलारंग संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाना पाटेकर यांचा जीवनपट शहरवासियांसमोर उलगडण्याचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी 5:00 वाजता. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमात काही स्थानिक कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील नाट्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील, तसेच इतर रसिकांनी कार्यकमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अमित गोरखे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे मोफतप्रवेशिका मिळण्यासाठी नॉव्हेल्स् एन. आय. बी. आर. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, संत तुकाराम व्यापार संकुल, निगडी येथे सकाळी 9 ते 5 या वेळात उपलब्ध असेल. प्रवेशिका मिळण्यासाठी 9881540066/9881520066 संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला कलारंग संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश लेले, सचिव दिनेश देशमुख, कार्यप्रमुख आशा नेगी, संकेत लोंढे, सुप्रिया धाईजे, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.