कळमडुला डिजिटल शाळेचे लोकार्पण

1

चाळीसगाव- जिल्हा परिषद कन्या व मुलांच्या शाळेत महाराष्ट्र युथ फौंडेशन यांच्या वतीने डिजिटल शाळा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन व लोकार्पण जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटक डॉ.पाटील यांनी महाराष्ट्र युथ फौंडेशन चे कौतुक केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे,सिनर्जी स्टडी पॉईंट पुणे चे संचालक अतुल लांडे,महाराष्ट्र युथ फौंडेशन चे अध्यक्ष अक्षय कोठावदे,कार्यकारी समन्वयक ऋषिकेश अमृतकार, सदस्य सचिन नागमोती ,सरपंच कविता पाटील,भैय्यासाहेब पाटील ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. गावाचे भूमिपुत्र व महाराष्ट्र युथ फौंडेशन चे अध्यक्ष अक्षय कोठावदे यांच्या या कार्याचे सर्वानी कौतुक केले.दोन्ही शाळांना प्रोजेक्टर,सोलरकीट देण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय कोठावदे तर सूत्रसंचालन सचिन नागमोती यांनी तर आभार ऋषिकेश अमृतकार यांनी मानले.