कसबा पेठेमधील मेट्रो स्थानकाला विरोध

0

पुणे : महामेट्रोकडून कसबा पेठ येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या स्थानकाला बाधित नागरिक विरोध करत आहेत. या रहिवाशांनी रविवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन करत स्थानकास विरोध केला.

कसबा पेठेतील फडके हौद येथील मेट्रो स्थानकाला विरोध करण्यासाठी कसबा पेठ मेट्रो स्टेशनविरोधी कृती संघाने पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या स्थानकामुळे बाधित होणार्‍या रहिवाशांनी मेट्रोला स्थानकाचे सर्वेक्षणदेखील करू दिलेले नाही. मेट्रोकडून या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार्‍या ठिकाणीच हे स्थानक निर्माण करावे, अशी मागणी या रहिवाशांनी केली. या आंदोलनामध्ये गणेश नलावडे, मुकुंद चव्हाण, लेफ्ट. कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), राजेंद्र झांबरे, प्रवीण तरवडे आदी सहभागी झाले होते.