कस्पटेवस्ती येथील सराफाचे दुकान चोरट्यांनी फोडले

0

30 किलो चांदी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी

पिंपरी :- कस्पटेवस्ती येथील कणक ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 30 किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असून गुरुवारी सकाळी उघडकीस आला.

मिळलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्पटे वस्ती येथे कणक नावाचे ज्वेलर्स आहे. बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन कामगार आणि मालक घरी गेले होते. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात असलेली 30 किलो वजनाची चांदी चोरुन नेली. तसेच सोन्याचे दागिने ही चोरून नेले असून ते किती आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु आहे. आजू बाजूला माहिती घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरु आहे.