काँग्रेस भवनातच काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला काळे फासले

0

जळगाव- काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍याने भीक मांगो आंदोलन करुन खळबळ उडवून दिल्याचा प्रकार ताजा असताना, गुरुवारी सकाळी काँग्रेस भवनमध्ये एका काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला काळे फासल्याची घटना घडली. दरम्यान कारण कळू शकलेले नाही. पदाधिकारी कॉग्रेसचा सरचिटणीस असल्याची तर काळे फासणारी काही दिवसांपूर्वी भीक मांगो आंदोलन करणारी महिला असल्याची माहिती मिळाली आहे. काळे फासल्यानंतर हा वाद शहर पोलीस ठाण्यात पोहचला होता. या ठिकाणी काळे फासलेल्या पदाधिकार्‍यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, डॉ. उल्हास पाटील हे उपस्थित होते. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागली असून त्यात घडलेल्या या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.