कांचननगर गवळीवाड्यात गच्चीवर मंडप टाकून जुगाराचा खेळ

0 3

डीवायएसपी रोहन यांच्या पथकाचा छापा ः घरमालक महिलेसह सात जण ताब्यात

जळगाव- शहरातीन कांचननगरातील गवळीवाडा येथे कालिंकामाता मंदिराजवळ कमलबाई हिरामण कोळी हिच्या घराच्या गच्चीवर चक्क मंडप टाकून आलिशान क्लबप्रमाणेच जुगाराचा खेळ खेळला जात होता. रविवारी पोलीस उपधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पथकासह या जुगार अड्डयावर छापा टाकून 13 हजार 620 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला असून महिलेसह सात जणांना ताब्यात घेतले असून यात एका 19 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. या कारवाईत दोन जुगारी गच्चीवरुन उडी मारुन पसार झाले होते.

कालिंकामाता मंदिराजवळ कमलबाई हिरामण कोळी या या महिलेच्या राहत्या घरावर गच्चीवर टेन्ट टाकून झन्ना-मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरिक्षक मनोहर जाधव, सचिन सुरेश साळुंखे, शनिपेठच्या महिला पोलीस अभिलाषा मनोरे या पथकासह कांचननगर गाठले. कोणालाही कानभुन लागू नये म्हणून डॉ. रोहन यांनी काही अंतरावर शासकीय वाहने उभी केली. यानंतर घटनास्थळ गाठून थेट घराच्या गच्चीवर सुरु असलेल्या अड्डयावर छापा टाकला.

या जुगार्‍यांना घेतले ताब्यात
कारवाई करुन पोलिसांनी जुगाराच्या साहित्य, मोबाईल व 3620 रुपये रोख रअसा एकूण 13 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कमलबाई हिरामण कोळीसह निवृत्ती हिलाल बाविस्कार, रविंद्र रामदास निकम, जितेंद्र देविदास कोळी, अक्षय अरुण जोहरी वय 19 सर्व रा.कांचननगर यांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान विनोद शांताराम तायडे, राहूल सुकदेव सैंदाणे हे गच्चीवरुन उडी मारुन पसार झाले. उडी मारल्याने त्यांना दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या क ारवाईने शनिपेठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.