Wednesday , December 19 2018
Breaking News

काजल, गुफरानने जिंकला महापौर चषक

मुंबई । मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित शिवाजी मंदिर ट्रस्टच्या दादर येथील शहाजी राजे सभागृहात झालेल्या 21 व्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेत इंडियन ऑईलच्या महम्मद गुफरानने जैन इरिगेशनच्या पंकज पवारला 18-14, 25-7 असे सरळ दोन सेटमध्ये नमवून मुंबई महापौर चषकावर आपले नाव कोरले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडिअन ऑईलच्या काजल कुमारीने अपेक्षेप्रमाणे प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या जैन इरिगेशनच्या निलम घोडकेला 25-6, 25-8 असे हरविले. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या महम्मद गुफरानने उपांत्य लढतीत ओएनजीसीच्या संदीप देवरूखकरला 25-6, 25-12 असे तर पंकज पवारने एस एस ग्रुपच्या अभिषेक भारतीला 21-16, 25-6, असे पराभूत केले होते.

महिला अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या काजलने पीसीडीए नेव्हीच्या प्रीती खेडेकरला 25-0,25-15 असे तर नीलमने आयुर्विमा महामंडळाच्या शिल्पा पळणीटकरला 21-17, 25-21 असे हरवले होते. विजेत्या खेळाडूंना माजी महापौर महादेव देवळे, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर व शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव तोरसकर यांच्या हस्ते महापौर चषक व रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले. याप्रसंगी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अरुण केदार, उपाध्यक्ष – यतीन ठाकूर, मानद सरचिटणीस – संजय देसाई, खजिनदार – रुद्रनाथ बागवे, सहसचिव – शिवाजी मंदिर ट्रस्टचे राजू नरे व स्पर्धेचे प्रमुख पंच अजित सावंत आणि रमेश चव्हाण उपस्थित होते.

About admin

हे देखील वाचा

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा चिवट खेळी सुरु

पर्थः ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आजपासून दुसरी कसोटी पर्थच्या मैदानावर खेळली जात आहे. या मालिकेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!