काम चुकारपणा करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना शिक्षा

0

आयुक्तांनी दिले भर उन्हात कवायतीचे आदेश

पिंपरी चिंचवड ः घटनास्थळी वेळेत न पोहचणे, तक्रारदारांच्या फोन कॉल्सना योग्य प्रतिसाद न देणे, कामावर वेळेत न पोहचणे, कामाकडे दुर्लक्ष करणे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा पालन न करता त्याचे उल्लंघन करणे, या कारणांवरुन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पोलिस कर्मचार्‍यांना भर उन्हात कवायती करण्याची शिक्षा दिली.

पिंपरी चिंचवड शहर परिसरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कायम भीतीचे वातावरण असते. मात्र पोलीस यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीत. या तक्रारी वारंवार थेट पोलीस आयुक्तांकडे केल्या जात आहेत. अशाच सुस्त पोलिसांना जाग करण्यासाठी भर उन्हात कवायती करण्याची शिक्षा देण्यात आली. पोलीस आयुक्तांनी केलेल्या या शिक्षेमुळे काही पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. तर पोलिसांनी शिस्तेचे विसर पडू नये आणि त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये, यासाठी ही शिक्षा दिल्याचे आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.