कायद्याचा धाक राहिला नाही.!

0

प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

दिल्लीतील शाहीनबाग व जामिया नगर भागातील ठिकाणी गेल्या चाळीस बेचाळीस दिवसापासून ’नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ निषेध व आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आता लोक रस्त्यावर उतरले असून या आंदोलकांना लक्ष करण्यासाठी काही तरुणांनी हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार देखील केलेला आहे. पोलीस समोर असताना या तरुणांनी हातात पिस्तुल घेऊन पोलिसांदेखत गोळीबार केला. इथे कायद्याचे राज्य आहे का?असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या देशात आहे. पोलीस दल आहे, महानिरीक्षक आहेत पण कायदा सुव्यवस्था आहे काय.? हा प्रश्न कायम आहे. संपूर्ण देशात दिवसाढवळ्या हत्यांचे सत्र सुरू आहे. असं कोणतंही शहर, नगर, महानगर व ग्रामीण भाग नाही की जिथं हत्या, स्त्रियांची विटंबना होत नसेल. संपूर्ण देश हत्या, आत्महत्या, बलात्काराच्या घटनांनी हादरले असून या देशात कायद्याचा मुडदा पाडला जात आहे.

गेली कित्येक वर्षे, किंबहुना स्वातंत्र्योत्तर काळात दिवसेंदिवस सबंध देशात गुन्हेगारी वाढत आहे. अनाचार, अनिती, व्यसनाधीनता, चैनबाजी, ऐश, मौजमजा, गुंडगिरी, भ्रष्टाचार यात सातत्याने वाढ होत आहे. मुलींवरील व स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेली कित्येक वर्षे, किंबहुना स्वातंत्र्योत्तर काळात दिवसेंदिवस सबंध देशात गुन्हेगारी वाढत आहे. अनाचार, अनिती, व्यसनाधीनता, चैनबाजी, ऐश, मौजमजा, गुंडगिरी, भ्रष्टाचार यात सातत्याने वाढ होत आहे. ब्रिटिश काळात शिस्त होती. आणि कायद्याचा जो धाक होता तो आज राहिलेला नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला जात आहे. हा कायद्याचा दुरुपयोग आहे. स्वातंत्र्यानंतर देशात आर्थिक , शास्त्रीय प्रगती भरपूर झाली. परंतु मानसिक, अध्यात्मिक प्रगती झाली नाही. राष्ट्रीय चारित्र्य असे आज काही राहिले नाही. देशासाठी त्याग, प्रामाणिकपणा,समाजहिताची जाणीव, सत्य या गुणांना फारसे महत्व कोणी देत नाही. लोक स्वार्थी बनत चालले आहेत. यथा राज तथा प्रजा अशी एक म्हण आहे. आता लोकशाहीमध्ये जसे नेते तसे लोक वागतात. अनेक नेते भ्रष्टाचारी, करोडोपती, दुराचारी आहेत. ते आपल्या नातेवाईकांना तिकिटे देतात. गुणांना किंमत राहिलेली नाही. जात, धर्म यांना अधिक महत्व आहे. भ्रष्टाचारात, गुन्ह्यातही याच गोष्टी प्रथम बघितल्या जातात. चारित्र्यवान लोकांचीच संख्या जास्त आहे. पण ते निमूटपणे हे सर्व बघत असतात. समाज अधिकाधिअक करमणूक-प्रधान होत आहे. मुलींवर अत्याचार हा एकूणच गुन्हेगारी वृत्तीचा आणि अनीतीचा एक भाग आहे. त्यामुळे केवळ तेवढ्यापुरता एखादा कायदा पुरणार नाही.

सध्या देशात नागरीकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून देशातील विरोधी पक्ष, नेते, काही नागरिक व काही समुदाय या कायद्याच्या विरोधात एकत्र येऊन देशात बंद,पुकारत निदर्शने करत आहे, हिंसा व जाळपोळ करत सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत कायदा आपल्या हातात घेत आहे. देशाच्या संसदेने एक महत्त्वाचा कायदा संमत केला आणि त्यावरून देशात वादळ उठलेले आहे. काही प्रमाणात त्यावरून जगभर प्रतिक्रियाही उमटत आहेत. इथे दंगली व हिंसाचार माजला आणि विरोधक अजून त्यावरून सरकारला प्रश्न विचारत आहेत. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तो देशव्यापी कायदा असूनही त्याची आपल्या राज्यात अंमलबजावणी करायला नकार दिल्याने घटनात्मक पेच उभे राहिले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा असे त्याचे नाव आहे आणि त्यामुळे आपले नागरिकत्व हरवून जाईल, अशी प्रामुख्याने मुस्लिम समाजात भीती पसरवण्यात आली आहे; पण वस्तुस्थिती काय आहे आणि खरेच त्या कायद्याचे परिणाम कसे असू शकतील, याची कोणालाही फिकीर पडलेली नाही. दंगल वा हिंसाचाराचे भांडवल करून काहूर मात्र खूप माजले आहे. वास्तविकता काय आहे, त्याचा खुलासा सरकार कितीही करीत असले तरी राजकीय गढूळ वातावरण संपत नाही.

दिल्लीतील शाहीनबाग व जामिया नगर भागातील ठिकाणी गेल्या चाळीस बेचाळीस दिवसापासून ’नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ निषेध व आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आता लोक रस्त्यावर उतरले असून या आंदोलकांना लक्ष करण्यासाठी काही तरुणांनी हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार देखील केलेला आहे.पोलीस समोर असताना या तरुणांनी हातात पिस्तुल घेऊन पोलिसांदेखत गोळीबार केला.इथे कायद्याचे राज्य आहे का?असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या देशात आहे.पोलीस दल आहे, महानिरीक्षक आहेत पण कायदा सुव्यवस्था आहे काय.? हा प्रश्न कायम आहे.

संपूर्ण देशात दिवसाढवळ्या हत्यांचे सत्र सुरू आहे.असं कोणतंही शहर, नगर, महानगर व ग्रामीण भाग नाही की जिथं हत्या, स्त्रियांची विटंबना होत नसेल.संपूर्ण देश हत्या, आत्महत्या, बलात्काराच्या घटनांनी हादरले असून या देशात कायद्याचा मुडदा पाडला जात आहे.

नागपूर व हिंगणघाट येथील घटनांनी तर इथं कायदा नाही ही बाब अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.नागपूर येथे दोन वेगवेगलळ्या घटना कौर्याची परिसीमा गाठणारीच आहे. एका 19 वर्षीय मुलीवर सतत रात्रभर अत्याचार करून त्या नराधमाने तीच्या गुप्तांगात राड टाकून पसार झाला. दुसर्‍या घटनेत अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीच्या प्रियकराने युवकाच्या डोक्यावर हतोड्याचा प्रहार करून खून केला. अत्यंत निर्दयी पणे मृतदेह आणि मोटार सायकलला जमिनीत पुरले.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भरचौकात तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणी 40 टक्के भाजली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना हिंगणघाट परिसरातील नंदोरी चौकात घडली आहे. पीडित तरुणी कॉलेजची प्राध्यापिका आहे. आरोपी आणि इतर दोघे घटनास्थळावरून पसार झाले . परंतु, पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये मुख्य आरोपीला अटक केली.लखनौत विश्वहिंदू महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रणजित श्रीवास्तव उर्फ रणजित बच्चन यांची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली.

या सर्व घटना काय दर्शवितात…कायदा नावाची वस्तू नेमकी काय आहे, त्याचे तरी भान देशातील नागरिकांना शहाण्यांना उरले आहे काय? अशी आता शंका येऊ लागली आहे. कुठल्याही देशातले सरकार वा सत्ता असते, तिचा खरा अंमलदार पोलीस किंवा सैनिक असतो. ज्याच्या हातात असलेले हत्यार सत्तेचे प्रतीक असते. त्याच शस्त्राच्या बळावर सत्ता राबवली जात असते. बाकी कागदावरचे कायदे किंवा आदेश निव्वळ दिखावू असतात. कारण जो काही कायदा असेल वा त्यानुसार सोडलेले आदेश असतात, त्याची अंमलबजावणी करण्याची शक्ती त्या सैनिकाच्या हातातल्या शस्त्रानेच कमावलेली असते. जोवर त्या शस्त्राचे बळ शिरजोर असते, तोवर ती सत्ता चालू शकत असते. जेव्हा त्या शस्त्राची अवहेलना वा टवाळी सुरू होते, तिथून सत्ता डळमळीत झाली म्हणून खुशाल समजावे. भारतात घडत असलेल्या घटना इथे कायद्याचे राज्य नाही ही बाब अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही.जनता खुलेआम नंग्या तलवारी घेऊन लोकांचे मुडदे पाडत आहे.हिंसा करत आहे, जाळपोळ करत आहे .कायद्याला आव्हान देत आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत आहे.या सर्व गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा असं वाटायला लागते की लोकांना कायद्याचा धाकच राहिला नाही. घडत असलेल्या घटना काय दर्शवितात.? याचा विचार करण्याची गरज आहे.