कायद्याचे राज्य आहे कुठे : माजी नगराध्यक्ष सुनील काळे

0

राजगृहावरील हल्ल्याचा वरणगावात निषेध : दोषींवर कारवाईबाबत पोलिसांना निवेदन

भुसावळ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृहावर समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचा तालुक्यातील वरणगावात निषेध करण्यात आला. समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न होऊन समाजात शांतता भंग होत असल्याने कायद्याचे राज्य आहे कुठे? असा सवाल आज भाजपा रीपाइं युतीच्या वतीने वरणगाव पोलिसात दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला. या घटनेतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, संजयकुमार जैन, आकाश निमकर, शामराव धनगर, हितेश चौधरी, संजय सोनार, रीपाई युती वरणगाव अध्यक्ष रुपेश मेढे, आकाश मेढे, चिक्कू इंगळे, मनोज तायडे, आकाश सोनवणे, भाजपाचे हितेश चौधरी, संजय सोनार, राहुल जंजाळे, हिमांशू चौधरी, संजय बेदरकर, अरुण बावणे, छोटू सेवतकर, मिलिंद भैसे यांच्यासह भाजपा-रीपाई युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.