कारगील विजय दिनानिमित्त भुसावळात दुचाकी रॅली

0

भुसावळ- 26 जुलै कारगील विजय दिनानिमित्त भुसावळ शहरातील टीव्हीएस कंपनीतर्फे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून शहरातून गुरुवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. पंकज ऑटोतर्फे रोटरी क्लब, भुसावळच्या सहकार्याने शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. सहा.अधीक्षकांचा सत्कार पंकज ऑटोतर्फे राजेश अग्रवाल यांनी तर रोटरी क्लबतर्फे प्रेसीडेंट प्रदीप दवे यांनी केला. नाहाटा कॉलेज चौफुल्लीवर शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पंकज ऑटो व रोटरी क्लबतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यशस्वीतेसाठी पंकज ऑटोच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य लाभले.